file photo
Latest
नागपूर : पत्नी, मुलाची हत्या करून पतीने आपले जीवन संपवले
नागपूर ; पुढारी वृत्तसेवा दोरीने गळा आवळून पत्नी, मुलाची हत्या केली. यानंतर स्वतः राइस मिल संचालकाने जीवन संपवल्याची थरारक घटना मौदा तालुक्यात घडली. अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडामधील शांतीनगर येथील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे), पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) अशी मृतकांची नावे आहेत. मृतकाचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
हेही वाचा :

