

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: खासदार नवनीत राणा यांना एका आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप क्रमांकावरून जीवे मारण्याची आणि उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप वर एक ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने मोठमोठ्या नेत्यांची नावे घेत बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची भाषा वापरली आहे. बुधवारी (दि.6) आमदार रवी राणा यांनी यासंदर्भात माहिती देत खासदार राणा यांना अफगाणिस्तान व पाकिस्तानातून ही धमकी आल्याचे सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा असेही ते म्हणाले. Navneet Rana
हेही वाचा