वाशिम: कारंजा, मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीने पिके भुईसपाट, पक्ष्यांचा मृत्यू | पुढारी

वाशिम: कारंजा, मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीने पिके भुईसपाट, पक्ष्यांचा मृत्यू

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे कारंजा, मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार, शिवनी वनोजा परिसरातील गहू, हरबरा, संत्रा फळबागेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर झाडावरील पक्ष्यांनाही मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. Washim

जिल्हा प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. Washim

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील चकवा परिसरात सोमवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे मंगरूळपीर कारंजा महामार्गावर विद्युत तारा तुटून पडल्या. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या परिसरात रात्री अचानक वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात चिंता पसरली असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button