वाशिम : एकबुर्जी गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत विषारी औषध मिसळले | पुढारी

वाशिम : एकबुर्जी गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत विषारी औषध मिसळले

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशीम तालुक्यातील एकबुर्जी या गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीत अज्ञात इसमाने विषारी औषध मिसळल्याची घटना आज (दि. २५) उघडकीस आली. पाणी पुरवठा करण्यापूर्वी हा पाणी पुरवठा करणाऱ्या सबंधित व्यक्तीच्या हा गंभीर प्रकार तात्काळ लक्षात आल्याने गावात पाणी पुरवठा खंडित केला. यामुळे फार मोठी जीवित हानी टळली. या घटनेची माहिती समजताच  ग्रामीण पोलिस व पथक आणि इतर यंत्रणा दाखल गावात झाली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Back to top button