BJP vs Congress: काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक; सोमवारी जि.प.समोर आंदोलन | पुढारी

BJP vs Congress: काँग्रेसविरोधात भाजप आक्रमक; सोमवारी जि.प.समोर आंदोलन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी जिल्हा परिषद परिसरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासले. भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले स्वतःचे नाव देत गवगवा करीत असल्याचा निषेध यावेळी काँग्रेसने केला. या विरोधात आता भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाले असून सोमवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोमवार (दि. ५) सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेश व्दाराजवळ हे आंदोलन केले जाणार आहे. BJP vs Congress

जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदारांचा फोटो छापल्यामुळे भाजप जि.प.सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्प फाडून त्याची सभागृहाबाहेर होळी केली. सभागृहातील सदस्यांचा रोष व्यक्त करण्याचा हा सनदशीर मार्ग असताना त्यांना जाणीवपूर्वक निलंबित करण्यात आले. एवढेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डींगला जाणीवपूर्वक काळे फासण्यात आले. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला काळे फासणे हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचे समर्थन होत आहे, हे निषेधार्ह आहे. म्हणून याचा निषेध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ हे निषेध आंदोलन करण्याचा निर्णय जिल्हा भाजपाने घेतल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहळे यांनी सांगितले. BJP vs Congress

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डींगला जाणीवपूर्वक काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना अटक करा, कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदाराची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून हटवण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button