नागपूर: शस्त्राचा धाक दाखवून ८ लाखांची रोकड पळवली | पुढारी

नागपूर: शस्त्राचा धाक दाखवून ८ लाखांची रोकड पळवली

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी रात्री उशिरा पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी अमित दुरुगकर यांच्या घरात दरोडा घातल्याची घटना घडली आहे. यात दरोडेखोरांनी ८ लाखांची रोकड लंपास केली.

दरोडेखोरांनी घरात घुसून मीटरमधून लाईट कनेक्शन बंद करून घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी अमित दुरुगकर याला मारहाण करुन जखमी केले. व जवळील शस्त्राचा धाक दाखवत तुझ्या आईला ठार करेल, अशी धमकी देऊन घरातून नगदी रक्कम ८ लाख रुपये पळवून नेले असल्याची तक्रार हुडकेश्वर पोलीस स्टेशमध्ये देण्यात आली आहे.

अज्ञात पाच ते सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे

हेही वाचा 

Back to top button