नागपूर ते सिंगापूर थेट विमान सेवा; ज्योतिरादित्य सिंधिया यांचा गडकरींच्या मागणीला प्रतिसाद

file photo
file photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भाच्या आर्थिक विकासाला, विशेषत: आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात चालना देण्यासाठी नागपूर ते सिंगापूर थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करण्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्राद्वारे, विदर्भाच्या विकासाची व्यवहार्य मागणी लक्षात घेत भारतीय विमान कंपन्यांना नागपूर ते सिंगापूर थेट उड्डाणे सुरू करण्यासाठी अवगत केल्याचे कळवले आहे.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) च्या चमूने ज्योतिरादित्य सिंधिया यांना विदर्भातील आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी आणि थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नागपूर आणि दक्षिण पूर्व आशिया यांच्यातील कनेक्टिव्हिटी सक्षम करण्याच्या दृष्टीने नागपूर -सिंगापूर विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात ज्योतिरादित्य सिंधिया यांना नागपूर दौऱ्यादरम्यान या संदर्भातील पत्र सादर केले होते.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या तपशीलवार पत्रात कोणतेही विमानतळ परदेशी विमान कंपनीसाठी 'पॉइंट ऑफ कॉल' म्हणून एएसए मध्ये नियुक्त असल्यास ते भारतात 'ने -आण' तत्वावर ऑपरेट केले जाऊ शकते. सध्या, सिंगापूरच्या नियुक्त वाहकांसाठी 'पॉइंट ऑफ कॉल' म्हणून नागपूर हे स्थान उपलब्ध नाही. भारत सरकारचे सध्या भारतीय वाहकांकडून नॉन-मेट्रो पॉईंट्सवरून थेट किंवा त्यांच्या स्वतःच्या देशांतर्गत ऑपरेशन्सद्वारे अधिक आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सला प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. जरी, सिंगापूर एअरलाइन्सच्या नियुक्त वाहकांना नागपूरवरून नियोजित प्रवासी उड्डाणे चालवण्याची परवानगी नसली तरी, भारतीय विमान कंपन्या नागपूरसह कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर/वरून सिंगापूरमधील स्थानांकरिता ऑपरेशन्स सुरु करू शकतात. त्यानुसार, भारतीय विमान कंपन्यांना नागपूर ते सिंगापूर थेट उड्डाणे सुरू करण्यासाठी अवगत केल्याचे करून त्यांनी पत्रात म्हटले आहे.

असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष, आशिष काळे यांनी विदर्भाची गरज लक्षात घेतल्याबद्दल आभार मानले असून नागपूर ते सिंगापूर कनेक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी भारतीय विमान कंपन्यांच्या प्रमुखांकडे त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news