नागपूर: कमिशनच्या वादातून फळ विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून | पुढारी

नागपूर: कमिशनच्या वादातून फळ विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गणेशपेठ बसस्थानक परिसरात एका फळ विक्रेत्याची चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. योगेश उमरे असे मृताचे नाव आहे. तर चेतन बगमारे, चेतन पाटील, आणि अन्य साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. Nagpur News

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत योगेश उमरे हा फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. यासोबतच तो बस स्थानक परिसरातील ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत कमिशनवर कामही करत होता. गणेशपेठ बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स व्यवसाय चालतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात बस स्थानकातून बाहेर मिळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कमिशन स्वरूपात लोकांना नेमण्यात येते. याच वादातून योगेश उमरे याचा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button