नागपूर : ट्रकने बहीण-भावाला चिरडले; जमावाने ट्रक पेटवून दिला | पुढारी

नागपूर : ट्रकने बहीण-भावाला चिरडले; जमावाने ट्रक पेटवून दिला

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपुरात वाठोडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत बिडगाव परिसरात एका अपघातात बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून देत वाहनाची तोडफोड केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात सुमित नंदलाल सैनी (वय १८ दुर्गानगर) आणि अंजली सैनी (वय १६) हे भाऊ-बहीण मृत्यूमुखी पडले. हे दोघे दुर्गानगर येथील रहिवासी होते, असे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अपघातात दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी या ट्रकला आग लावली. अग्निशामक दलाच्या वाहनाकडून या टिप्परवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button