नागपूर : शिंदे गट १०० टक्के भाजपमध्ये विलीन होणार: विजय वडेट्टीवार | पुढारी

नागपूर : शिंदे गट १०० टक्के भाजपमध्ये विलीन होणार: विजय वडेट्टीवार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा आमदार अपात्रता संदर्भात सुनावणी पूर्ण झाल्याने आता निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकत असतानाच आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आता नवा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन होणार असून, हे १०० टक्के खरे असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामुळे आता भाजपची खरी चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही कळेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपला स्वबळावर सरकार आणण्यासाठी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवायच्या आहेत. आता लोकसभेत त्यांना किती जागा मिळतील, हे कळेलच, असेही वडेट्टीवार म्हणाले. दोन दिवसांपूर्वी वडेट्टीवार यांनी राज्यात १० जानेवारीनंतर मुख्यमंत्री बदलणार असल्याचे भाकित केले होते.

हेही वाचा : 

Back to top button