भंडारा: कैची दाखवून विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक | पुढारी

भंडारा: कैची दाखवून विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहितेवर एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.२२) घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तुषार रामचंद्र बुरडे (वय ३६, रा. काटी, ता. मोहाडी) याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विवाहितेवर कैची हातात घेवून बळजबरीने अत्याचार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंह करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button