यावर आक्षेप नोंदविले जात आहे. करवाढ अवाजवी असल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रशेखर चौधरी तसेच ओम तिवारी यांनी दिला. याशिवाय शहरात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका वैशाली सवई, उषाताई दिवटे, पल्लवीताई रामटेके, ताई मसाळ, अजय किन्हीकर, कपिल गजभिये आदी उपस्थित होते.