नागपूर : रात्री ८ ते १० दरम्यान फोडा फटाके, महापालिकेकडून आवाहन | पुढारी

नागपूर : रात्री ८ ते १० दरम्यान फोडा फटाके, महापालिकेकडून आवाहन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी आता सायंकाळी ८ ते रात्री १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे. नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत स्वच्छ, शुभ दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

वायु प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी  यांनी फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच संबंधित विभागांना याबद्दल आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

नागपूर शहरातील वायू प्रदूषण वाढत असून ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी याबाबत निरंतर कार्यवाही गरजेची असून त्यादृष्टीने महानगरपालिकेने पाऊल टाकले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली असून या वेळांच्या योग्य पालनाबाबत कार्यवाहीच्या दृष्टीने मनपासह नागपूर पोलीस विभागाला देखील उच्च न्यायालयातर्फे सूचना देण्यात आली आहे. याशिवाय शहरामधील बांधकांम स्थळांबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

इमारत बांधकाम स्थळावरील धुळ उडू नये व ते धुळीकण हवेत मिसळू नये यासाठी बांधकाम स्थळी लोखंडी पत्रे लावावेत. तसेच सतत पाण्याची फवारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास यांचेद्वारे शहरात कार्य सुरू असलेल्या सर्व ठिकाणी देखील नियमित पाण्याची फवारणी करण्याची आवश्यक दिशानिर्देशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button