Nagpur News: अमिर्झा जंगलात वाघाची शिकार; ६ जण अटकेत | पुढारी

Nagpur News: अमिर्झा जंगलात वाघाची शिकार; ६ जण अटकेत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: गडचिरोली जिल्ह्यातील अमिर्झा जंगलात झालेल्या वाघ शिकारप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. शेतपीके वाचविताना रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी कुंपणात वीजप्रवाह जोडला होता. या विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाला होता. (Nagpur News)

रानटी प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांनी कुंपणात वीजप्रवाह जोडला होता. यामध्ये वाघांचा मृत्यू झाला. याची माहिती वनविभागाला देण्याऐवजी ग्रामस्थांनी विविध शस्त्रांचा वापर करून मृत वाघाचे पंजे-जबडा आणि मिशा कापून या वाघाचे सर्व अवयव लपविले. मात्र शिकारीची माहिती मिळताच वनविभागाने कारवाई केली. चौकशी दरम्यान ६ ग्रामस्थांना ताब्यात घेत, वनविभागाने त्यांच्याकडून नखे-दात आणि मिशांसह शस्त्रे जप्त केली आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे यांनी दिली आहे. (Nagpur News)

हेही वाचा:

Back to top button