Maratha Aarakshan: सरकार जरांगे-पाटील यांच्‍या जीवाशी खेळण्याचे राजकारण करतंय- उद्धव ठाकरे | पुढारी

Maratha Aarakshan: सरकार जरांगे-पाटील यांच्‍या जीवाशी खेळण्याचे राजकारण करतंय- उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन: मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे ते त्यांना मिळायला हवेत. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे.  (Maratha Aarakshan)

मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील उपोषण करीत आहेत. आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय?, असा सवाल करत  सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (Maratha Aarakshan)

हेही वाचा:

Back to top button