

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या विषयात लक्ष घालून आहेत. जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटते सर्वांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांशी बोलताना केले. Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे – पाटील यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे, शेवटी जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जरांगे पाटलांसोबत असणाऱ्या लोकांनी देखील त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. Devendra Fadnavis
दरम्यान, आज केरळमध्ये स्फोट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे काही अलर्ट देण्यात आला आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात,आपण नेहमीच अलर्टवर असतो. वेगळ्या कुठलाही अलर्ट दिलेला नाही. जे काही केरळमध्ये घडलेले आहे. त्याची सगळी माहिती निश्चितपणे लवकरच आपल्यापर्यंत देखील पोहोचेल. मुंबई, पुण्यासारखी अत्यंत महत्त्वाची शहरे आपल्याकडे असल्याने निश्चितपणे दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवून आहोत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा