Washim News: सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळकेंवर विनयभंगाचा गुन्हा; महिला अधिकाऱ्याची तक्रार

file photo
file photo


वाशिम: वाशिम येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कार्यालयातीलच एका महिला अधिकाऱ्याने वाशिम पोलिस ठाण्यात १४ ऑक्टोबररोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबरला पोलिसांनी संशियताची चौकशी केली होती. साक्षी तपासल्यानंतर न्यायालयात चार्जशिट दाखल केली जाईल, अशी माहिती ठाणेदार गजानन धंदर यांनी दिली. (Washim News)

यासंदर्भातील तक्रारीत पीडित महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे की, वाशिम कार्यालयात जुलै २०२३ मध्ये सहायक आयुक्त म्हणून प्रफुल्ल शेळके रुजू झाला. तेव्हापासूनच तो माझ्यावर पाळत ठेवून आहे. काहीच काम नसतानाही वारंवार स्वत:च्या केबीनमध्ये बोलावणे, टक लावून पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करणे आणि द्विअर्थाने संभाषण करणे त्याने सातत्याने सुरू ठेवले. आपण त्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले. पण त्याच्या वागणुकीत कुठलाच फरक पडला नाही. याऊलट मी प्रतिसाद न दिल्याने लहानसहान कारणांवरून नोटीस देऊन त्रास देणे सुरू केले. वरिष्ठांसोबत माझ्याबाबत व्हॉटसअॅपवर खालच्या भाषेत 'चॅटींग'ही केले. अशाप्रकारे माझा शारिरीक व मानसिक छळ केला. (Washim News)

सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याने आपण काम करित असलेल्या ऑफीसमध्ये हेतुपुरस्सर 'सीसी कॅमेरा' लावला. त्याचा 'अॅक्सेस' त्याने स्वत:च्या केबीनमध्ये ठेवला. याद्वारे तो सतत माझ्यावर नजर ठेवत होता, असाही गंभीर आरोप पीडित महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news