फायझरच्या कोरोना लसीत कॅन्सरच्या विषाणूचे DNA; कॅनडा हेल्थची माहिती | Cancer Virus DNA in Corona Vaccine

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणूच्या उद्रेकाला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील औषध कंपन्या आणि संशोधन संस्था यांचे प्राधान्य कोरोनावर लस बनवणे हे होते. मॉडर्न, फायझर, भारतातील भारत बायोटेक अशा विविध कंपन्या कोरोनावरील लस शोधण्यात अग्रगण्य ठरल्या; पण फायझरच्या लसीबद्दल धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. फायझरच्या कोरोनच्या लसीमध्ये Simian Virsu 40 (SV40) DNA हा व्हायरस मिळून आला आहे. गंभीर प्रकार म्हणजे या DNA सिक्वेन्स कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतो. (Cancer Virus DNA in Corona Vaccine)

Cancer Virus DNA in Corona Vaccine : संशोधक आणि तज्ज्ञांत मतमतांतरे

हेल्थ कॅनडा या संस्थेने ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. विशेष म्हणजे फायझरने यापूर्वी याबद्दल कोणतीच माहिती दिलेली नव्हती. हा धक्‍कादायक खुलासा झाल्‍यानंतर  संशोधक आणि तज्ज्ञांत मतमतांतरे दिसून येत आहेत. काही तज्ज्ञांच्‍या मते, यामुळे कॅन्सर होऊ शकतो, तर काहींनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

लसीच्या 'प्लाज्मिड'मध्ये कोणते डीएनए याची माहिती देणे अपेक्षित

हेल्थ कॅनडाने माध्यमांना या संदर्भात मेल केलेला आहेत. यामध्‍ये नमूद केले आहे की,  "ज्यांनी लस शोधली आहे किंवा जे लसीचा प्रस्ताव सादर करत आहेत, त्यांनी या लसीच्या प्लाज्मिडमध्ये कोणते डीएनए आहेत, याची माहिती देणे अपेक्षित असते." फायझरच्या लसीच्या प्लाज्मिडचा डीएनए सिक्वेन्स लसीसोबत सादर करण्यात आला होतो; पण यात SV40चा कोणताही उल्लेख नव्हता. संशोधक केविन मॅक्रेनान, डॉ. फिलिप जे. बॅकहोल्टस आणि जाहीररीत्या SV40बद्दल यापूर्वी तक्रार केली होती. (Cancer Virus DNA in Corona Vaccine)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news