नागपूर : दंत महाविद्यालयातील अधिष्ठात्यांच्या ई-मेलवर रॅगिंगची तक्रार

नागपूर : दंत महाविद्यालयातील अधिष्ठात्यांच्या ई-मेलवर रॅगिंगची तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : यापूर्वी मेडिकलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघड झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. आता शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात एक प्रथमवर्षं विद्यार्थिनीच्या रॅगिंगची तक्रार थेट अधिष्ठात्यांच्या ई-मेलवर करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात अखेर मेडिकल प्रशासनाने चौकशी केल्यावर सर्वच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असे काहीही झाले नसल्याचे लेखी लिहून दिले. त्यामुळे मग एक-एक विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधला.

शुक्रवारी ॲन्टी रॅगिंग समितीची बैठक घेतली गेली. यावेळीही सर्व विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात रॅगिंग झाले नसल्याचे सांगितले. वारंवार असा प्रकार घडू नये, म्हणून विद्यार्थ्यांना दोषीचे नाव सांगण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केल्यावरही ते असे काहीही झाले नसल्यावर ठाम राहिले. त्यानंतर तीन सदस्यीय समितीकडून चौकशी झाली. प्रथमदर्शनी रॅगिंग झाली नसल्याचे पुढे आले. त्यामुळे आता हा अहवाल तयार करून संबंधित विभागांना पाठविला जाणार आहे. या प्रकरणात विविध स्तरावर चौकशी केली. रॅगिंग झालीच नसल्याचे पुढे आले आहे. प्रशासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाते. त्यामुळे असा काही प्रकार शक्य नाही., असा दावा दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी केला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news