काँग्रेसममध्ये वाद नाही, चर्चा पण नाही- नाना पटोले | पुढारी

काँग्रेसममध्ये वाद नाही, चर्चा पण नाही- नाना पटोले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  कॉंग्रेसच्या पूर्व विदर्भ विभागीय बैठकीत राडा झाला, यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत कुठलाच वाद झाला नाही. बाहेर याची चर्चा होऊ शकत नाही. हा पक्षांतर्गत विषय आहे, असे सांगत वेळ मारून नेली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा सर्व गदारोळ झाल्याने त्यांनीच कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

जरांगे- पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पटोले म्हणाले,
मनोज जरांगे- पाटील काय बोलतात? यापेक्षा हा वनवा भाजपने पेटवला आहे, तो त्यांनीच थांबवला पाहिजे, यावर भर दिला.

इंडिया आघाडीची रॅली नागपूरला होणार का, यात मध्यप्रदेशच्या निवडणुकांमुळे नागपुरात इंडिया अलायन्सची पहिली जाहीर सभा व्हावी, अशी चर्चा सुरू होती. हैदराबादमध्येही या विषयावर चर्चा झाली. जेव्हा होईल तेव्हा कळवावे आम्ही तयार आहोत. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पूर्णतः तयार आहे. नागपूर हा देशाचा मध्यवर्ती भाग आहे, दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती घडवली, त्यामुळे ही सभा नागपुरात व्हावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची इच्छा आहे, असे पटोले म्हणाले.

राज्यात हास्यजत्रा सरकार आहे, काही जण वाघ नखं न आणता खाली हाताने येतात आणि आपलाच सत्कार करतात, काय चालले आहे या महाराष्ट्रात. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. आदिवासी आरक्षण बाबतीत पटोले म्हणाले, धर्मराव बाबा आत्राम म्हणतात 1 लाख लोक बोगस आदिवासी नोकरीवर लागले आहेत.  कागदोपत्री नसेल, तर सरकारने कारवाई करावी, बोगस म्हणणं दुर्दैवी आहे, जातीजातीत द्वेष निर्माण करण्याचे धोरण सरकारने बंद करावे. मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी छेडले असता मोदी देऊन जातील की घेऊन जातील, महाराष्ट लुटून नेण्याचे काम मोदी करतात, आता काय देतात की नेतात? हा प्रश्न कायम आहे.

हेही वाचा 

Back to top button