नागपूर : काँग्रेस पक्ष लागला निवडणुकीच्या कामाला, उद्या पूर्व विदर्भाचा घेणार आढावा | पुढारी

नागपूर : काँग्रेस पक्ष लागला निवडणुकीच्या कामाला, उद्या पूर्व विदर्भाचा घेणार आढावा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. आज बुधवारी (दि.११) रोजी पश्चिम विदर्भातील अमरावतीचा आढावा घेतला असून उद्या गुरुवारी नागपूर विभागातील सहा मतदारसंघाचा आढावा नागपुरातील बैठकीत घेतला जाणार आहे. सकाळपासून ही आढावा बैठक होणार असून त्यात जिल्हानिहाय बैठकांचे सत्र होणार आहे. काँग्रेसने पूर्व विदर्भातील सर्व जागा लढवाव्यात, असा सूर नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

संबधित बातम्या 

पूर्व नागपुरातील महाकाळकर सभागृहात जिल्हानिहाय ही बैठक होणार आहे. या बैठकीत मंडळ समित्या, बुथ प्रमुख, मतदार यादीची तपासणी तसेच मतदारसंघातील स्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हानिहाय हा आढावा घेण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यास ठराविक कालावधी देण्यात आला आहे.

नागपूर शहरानंतर ग्रामीण आणि नंतर वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर शहर व ग्रामीणच्या बैठका होणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, प्रभारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व मंडळ अध्यक्षांसह सर्व बुथ प्रमुखांना या आढावा बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button