गडचिरोली: कत्तलीसाठी नेणाऱ्या २२ जनावरांची सुटका: ट्रकसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

गडचिरोली: कत्तलीसाठी नेणाऱ्या २२ जनावरांची सुटका: ट्रकसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २२ जनावरांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी दोन ट्रक आणि गोवंश असा एकूण २१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मागील काही दिवसांपासून कोरची, कुरखेडा तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी केली जात आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने ६ ऑक्टोबरला कुरखेडा तालुक्यातील आंधळीमार्गे ट्रकमधून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आंधळी मार्गावर पाळत ठेवली असता समोरुन दोन ट्रक येताना दिसले. पोलिसांना पाहताच चालक ट्रक सोडून पसार झाले. ट्रकमध्ये २२ जनावरे निर्दयपणे कोंबून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी १लाख ५४ हजार रुपये किंमतीच्या या गोवंशाची सुटका करुन २० लाख रुपये किमतीचे दोन्ही ट्रक जप्त केले. आरोपींविरुद्ध कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक(अभियान)अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबूराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यलगडे व मनोज राऊत आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा 

Back to top button