पुन्हा देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे : आशिष देशमुख

आशिष देशमुख
आशिष देशमुख

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेली इच्छा त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखविते, परंतु, देवेंद्र फडणवीस यांनीच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, असे राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांची इच्छा आहे, अशी भावना माजी आमदार तथा ओबीसी नेते डॉ. आशिष देखमुख यांनी व्यक्त केली. आज गुरूवारी (दि.५) रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्य ते चंद्रपूरात आले असता माध्यमांशी बोलत होते.

संबधित बातम्या 

डॉ. आशिष देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना स्विकारले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनाही सामावून घेतले. मात्र, देवेंन्द्र फडणवीसच पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही राज्यभरातल्या भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळावे.

२०१९ मध्ये भाजप सेनेला जनमताचा कौल मिळाला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला हवे होते, परंतु, उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले नाही. मात्र, संजय राऊत उलट भाजपने गद्दारी केल्याचे खोटारडे बोलताहेत. मातोश्रीवर अमित शहांसोबत जी बैठक झाली त्यामध्ये उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मात्र ठाकरेंनी खोटे बोलून ते कारण केले. आणि फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखले. भविष्यात पुन्हा देवेंद फडणवीस यांनीच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी अशी राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि आम्हची इच्छा आहे, असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

ओबीस जनगणनेसाठी देवेंद्र फडणवीस सकारात्मक

जणगणना व्हावी ही ओबीसी समाजाची फार वर्षांपासूनची मागणी आहे, ती योग्यही आहे. देशात बिहार सरकारने जणगणनेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यापाठोपाठ ओरिसाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीस जणगणना डाटा सर्वेक्षण होण्यासाठी सकारात्म्क भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात ही जणगणना झाली तर राज्यातील ओबीसी प्रवर्गाची स्थिती पुढे येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार ओबीसी नेते आशिष देशमुख यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news