नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे केली.
नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर (Nanded Hospital Death) राज्यात खळबळ उडाली. यातील मृत्यूकांडाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांची समिती मंगळवारपासून (दि. ३) येथे कार्यरत आहे. या समितीच्या चौकशीचा अहवाल राज्य शासनाकडे देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (दि. ५) बैठकीत केली. तसेच औषध खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांनाही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.