सातारा : श्रीमंत रामराजे यांच्या भेटीला खासदार उदयनराजे; दीड तास बंद दाराआड चर्चा | पुढारी

सातारा : श्रीमंत रामराजे यांच्या भेटीला खासदार उदयनराजे; दीड तास बंद दाराआड चर्चा

फलटण ; पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या लक्ष्मी-विलास या निवासस्थानी सकाळी अचानक ९ वाजता भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले दाखल झाले. यावेळी श्रीमंत रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात खलबते झाली असण्याची शक्यता या निमित्ताने वर्तविण्यात येत आहे.

जर्मनी गँग खंडणीच्या तगाद्यास कंटाळून युवकाची आत्महत्या

या भेटीमुळे पुन्हा एकदा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर हेच मुख्य केंद्रबिंदू असल्याचेच सिद्ध होत आहे. दरम्यान जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व खा. उदयनराजे यांच्यामध्ये सुद्धा अर्धा तास कमराबंद चर्चा झाली.

Back to top button