Nagpur Flood : मनपा मुख्यालयातील सीओसीला बावनकुळेंची भेट

Nagpur Flood
Nagpur Flood
Published on
Updated on

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर-मनपा मुख्यालयातील 'श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर' (सीओसी) ला आज (शनिवार) भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी भेट दिली. शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची त्‍यांनी पाहणी केली.

मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. कामठी शहरातील विविध वस्त्यात पाणी शिरले. रात्री 2 वाजता नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news