Nagpur News: शेतकऱ्यांना भरभरून मदत करण्याची सरकारला सद्बुद्धि दे बाप्पा - विजय वडेट्टीवार | पुढारी

Nagpur News: शेतकऱ्यांना भरभरून मदत करण्याची सरकारला सद्बुद्धि दे बाप्पा - विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: आजचा दिवस पवित्र  असून, गणपतीची स्थापना आमच्याही घरी करण्यात आल. गणपती बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना सुखी आनंदी राहू दे. महाराष्ट्रावर, देशावर कोणाची वाईट नजर पडू देऊ नको, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच पुढे वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांना भरभरून मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी बाप्पांनी द्यावी; अशी अपेक्षा देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

गणपती उत्सवाला गालबोट न लागता तो उत्साहात साजरा व्हावा, तोडफोडीचे राजकारण संपवून मन दुखावणारं राजकारण बंद होऊ दे, गरिबाला गव्हाच्या ऐवजी मका दिला जात आहे. गरीब मका खातो का? कुणबी कृती समितीने आंदोलन स्थगित केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन आता पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील ७ दिवसात सरकार बैठक लावतील अशी अपेक्षा आहे. फूट वगैरे पडायचा विषय नाही. ओबीसी हितासाठी जो लढतो तो आंदोलनात टिकेल ज्याला पक्षाची झुल पांघरायची आहे ते नालायक आहेत. आंदोलन संपले म्हणजे लढाई संपली असा त्याचा अर्थ नाही. आमच्या मुळावर जो येईल त्याला आम्ही योग्यवेळी धडा शिकवू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

हेही वाचा:

Back to top button