वाशीम : शिरपूरचे जवान आकाश अढागळे यांना लेहमध्ये वीरमरण | पुढारी

वाशीम : शिरपूरचे जवान आकाश अढागळे यांना लेहमध्ये वीरमरण

वाशीम : पुढारी वृत्तसेवा : शिरपूर येथील जवान आकाश अढागळे यांना लेहमध्ये वीरमरण आले. कर्तव्यावर असताना उंच पहाडावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रविवारी (दि. १० सप्टेंबर) रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.

अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत १२ वर्षापूर्वी आकाश अढागळे भारतीय सैन्यात दाखल झाले होते. लेह येथे सेवा बजावत असताना उंच पहाडावरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. १० सप्टेंबर रोजी त्यांना वीरमरण आले.  काही वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षाची मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button