Nana Patole: हुकूमशाही सरकारनेच पायउतार व्हावे- नाना पटोले

 संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: भाजपने लोकशाही आणि संविधान धोक्यात आणले आहे. हुकूमशाही सरकारविरोधात जनतेला भयमुक्त करण्यासाठी काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आजपासून सुरू होत आहे. भाजपच्या मूठभर मित्रांचा विकास हेच मोदी सरकारचे 'सबका साथ सबका विकास' धोरण असून, सर्वसामान्यांना लुटले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे हुकूमशाही सरकारने पायउतार व्हावे, असे देखील पटोले यांनी म्हटले आहे.

विदर्भाची संवाद यात्रा आज(दि.३ सप्टेंबर) वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथून सुरू होत आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील यात्रा तूर्तास स्थगित (Nana Patole) करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

जालन्यात मराठा समाज त्यांचे न्यायिक हक्कासाठी बसलेला असताना त्यांच्यावर भाजप सरकारने लाठीमार केला. या घटनेमुळे जो वणवा पेटला आहे, तो विझवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हि निवडणूकीची पूर्वतयारी आहे का? असा प्रश्न विचारला असता, लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यामुळे ही यात्रा निवडणुकीसाठी असे म्हणता येणार नाही. तानाशाही प्रवृत्ती विरोधात जनतेला जागृत करण्यासाठी ही यात्रा आहे. बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांना हिंमत देऊन जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी ही यात्रा आहे. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले.

फडणवीस सरकार असताना मराठा आरक्षण, धनगर आरक्षण संदर्भात खोटी आश्वासने देण्यात आली होती. मुळात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून ज्या ज्या मागास जाती आहेत त्यांना आरक्षण देता येऊ शकते. केंद्र सरकारने ते करावे अशी अपेक्षा आहे. मात्र, मोदी सरकारला ते करायचं नाही. उलट ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणजेच मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही पटोले (Nana Patole) म्हणाले.

जालनामध्ये पोलीस अधीक्षकांचा दोष काय? सरकारनेच त्यांना आदेश दिले त्यांनी आदेशाचे पालन केले. सरकारने सौम्य लाठीमार करण्याचा आदेश दिल्याचे स्वतः गृहमंत्री सांगताहेत. यामुळे पोलीस अधीक्षकांचे निलंबन नको तर सरकारनेच पायउतार व्हावे; अशी मागणी आहे. एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला द्या, असे होऊ शकत नाही. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे.

Nana Patole: प्रफुल्ल पटेल यांनी भाजपशी संबंधावर बोलावे

दरम्यान, शनिवारी नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टिका केली. यावर पटेल यांच्याविषयी काय बोलावं, आधी त्यांनी त्यांचे जे अनैतिक संबंध भाजपसोबत जोडले आहेत,त्याबद्दल बोलावे असे आव्हान नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल दिले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news