Sana Khan : सना खान यांच्या मृतदेह शोधसाठी पुन्हा मोहीम राबवणार, आरोपीची होणार नार्को!

Sana Khan : सना खान यांच्या मृतदेह शोधसाठी पुन्हा मोहीम राबवणार, आरोपीची होणार नार्को!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सना खान हत्या प्रकरणातील आरोपी अमित शाहूच्या नार्को टेस्टसाठी नागपूर पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, सना खानचा मृतदेह अद्यापही न मिळाल्याने नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा नागपूर पोलिसांची तीन पथके सना हीच मृतदेह शोधण्यासाठी जबलपूरला रवाना झाली आहेत. (Sana Khan)

सना खान हत्‍या प्रकरणी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, सना हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सूत्रधार अमित ऊर्फ पप्पू शाहू, त्याचा मित्र राजेश सिंग, धमेंद्र यादव, धमेंद्रचे वडील रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव व कमलेश पटेल या पाच जणांना अटक केली आहे. आरोपी अमित शाहू याच्या नार्को टेस्टसाठी नागपूर पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

सना खानचा मृतदेह अद्यापही न मिळाल्याने नागपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. (Sana Khan ) या प्रकरणी पुन्हा एकदा नागपूर पोलिसांची तीन पथके सना हीच मृतदेह शोधण्यासाठी जबलपूरला रवाना झाली आहेत. हिरन नदीच्या काठावरील गावात स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. एक कपडे असलेली बॅग सापडली आहे. मात्र, अद्याप सना यांचा मोबाईल देखील न सापडल्याने हत्येचे गूढ उलगडलेले नाही.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news