BJP leader Sana Khan Murder case | सना खान मर्डर मिस्ट्रीचा उलगडा, मृतदेह डिक्कीतून नेऊन नदीच्या पुरात फेकला!

BJP leader Sana Khan Murder case | सना खान मर्डर मिस्ट्रीचा उलगडा, मृतदेह डिक्कीतून नेऊन नदीच्या पुरात फेकला!

नागपूर : पुढारी वृत्तसेवा; भाजप अल्पसंख्याक विभागाच्या नेत्या सना खान (BJP leader Sana Khan Murder case) यांची जबलपूरमध्येच हत्या करुन मृतदेह कारने घेऊन जात हिरन नदीत फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू साहूच्या मानकापूर पोलिसांनी जबलपूरमध्येच मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसानी दिली.

मानकापूर पोलिसांचे एक पथक अमितला घेऊन नागपूरकडे रवाना झाले. आरोपींस आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी अमित व त्याचा नोकर दोघांना ताब्यात घेतले. एका आरोपीचा शोध सुरू असून आरोपी नागपूरात आल्यावरच अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमित शाहूने कडाक्याचे भांडण झाल्यानंतर सना खान यांची २ ऑगस्टलाच हत्या केली. सना यांचा मृतदेह हिरण नदीत फेकला. मात्र, अद्यापही नागपूर आणि जबलपूर पोलिसांना सना यांचा मृतदेह सापडला नाही. दरम्यान, या घटनेनंतर अमित ढाबा बंद करून पसार झाला होता. त्याचा शोध जबलपूर आणि नागपूर पोलिस शोध घेत होते. शेवटी नागपूर पोलिसांनी अमित साहूला शुक्रवारी अटक केली.

जबलपूरमध्ये अमित शाहू हा रेती चोरी करून अवैध मार्गाने तस्करी करतो. तसेच अवैध दारु विक्रीची टोळी देखील चालवितो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो कुख्यात गुंड म्हणूनच ओळखला जातो. त्याच्याशी भाजप नेत्या सना खान यांची ओळख झाली. पुढे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. नागपूरवरून सना खान जबलपूरला हॉटेल व्यवसायातील भागीदार अमित शाहू याच्या भेटीला गेल्या होत्या. अमितकडून सना यांना ५० लाख रुपये घेऊन परत यायचे होते. मात्र, २ ऑगस्टपासूनच सना यांचा मोबाईल बंद येत होता. अखेरीस त्यांच्या आईला संशय आल्याने मानकापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. अमित शाहू अचानक हॉटेल बंद करून नोकरासह बेपत्ता झाल्याने पोलिसांचा संशय बळावला.

मृतदेह मिळणार की नाही?

नागपूर पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त होते. ती कार स्वच्छ केल्याची आणि सना यांची हत्या केल्याची कबुली यापूर्वीच दिली होती. आता अमितने हत्येची कबुली दिल्याने एकंदर चित्र स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला घटनास्थळावर नेट घटनाक्रम जुळविल्याचे कळते. पण आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने सना खान यांचा मृतदेह मिळणे आवश्यक झाले आहे. मृतदेह टाकला तेव्हा या नदीला पूर होता. ही नदी पुढे काही अंतरावर नर्मदेला मिळते. त्यामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी असल्याची माहिती पोलिस सूत्रानी दिली. (BJP leader Sana Khan Murder case)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news