Sana Khan Murder: भाजप नेत्या सना खान यांची हत्याच; आरोपीची कबुली | पुढारी

Sana Khan Murder: भाजप नेत्या सना खान यांची हत्याच; आरोपीची कबुली

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर शहरातील पश्चिम नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांची अखेर हत्या (Sana Khan Murder)  झाल्याचे उघड झाले आहे. जबलपूर येथून कुविख्यात गुन्हेगार असलेल्या अमित शाहू यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे. आज (दि.११)  रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी गुन्हे शाखेचे पोलीस पथक नागपुरात येणार आहेत. मात्र, सना खान यांच्या मृतदेहाचा अजूनही पत्ता न लागल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.

१ ऑगस्टला सना खान नागपूरवरून जबलपूरला गेल्या होत्या. सकाळी पोहोचल्याचा फोन आला. मात्र नंतर कुठलाही संपर्क न झाल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या आईने मानकापूर पोलिसात दिली. तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांची दोन पथके जबलपूरकडे रवाना झाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीमेत आठवडा उलटूनही थांगपत्ता न लागल्याने व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय व्यक्त केला गेला. (Sana Khan Murder)

पोलिसांपुढे देखील या प्रकरणी तपासाचे मोठे आव्हान होते. सना खान १ ऑगस्टरोजी आपल्या मित्रांसोबत जबलपूरला गेली होती. पोलिसांनी सुरुवातीला सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तपासाच्या सुरूवातीला अमितचा भाऊ व ढाब्यावरील नोकराला ताब्यात घेतले होते.  त्यानेच रक्ताचे डाग असलेले कपडे नदीत फेकले, कार धुतल्याचे सांगितल्यानंतर काल दुसऱ्यांदा पोलीस पथक आरोपी अमितवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून रवाना झाले. यापूर्वी, नागपूर पोलिसांची दोन पथके जबलपूरला सना खान यांच्या शोधासाठी   रवाना झाली होती. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढीस तपास सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button