दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात संभाजी भिडे यांचा कार्यक्रम आयोजित करणारे आणि भिडे यांच्या शहर प्रवेशाला विरोध करणारे अशा दोन्ही बाजूच्या 35 ते 40 जणांवर दौंड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. भिडे यांना शहरात येऊ देऊ नये, यासाठी दौंडमधील दलित संघटनांनी तीव्र विरोध करून मोठी घोषणाबाजी केली होती.
गुन्हे मागे घ्यावेत म्हणून शुक्रवारी( दि. 20) दौंड पोलिस ठाण्याच्या समोर बौद्ध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे, त्यामुळे शहरातील वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.