नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भात रोवणीचा प्रत्यक्ष अनुभव | पुढारी

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भात रोवणीचा प्रत्यक्ष अनुभव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये भाताची रोवणी करताना श्री पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी धान बांधीत उतरुन रोप लावणी केली.

जिल्ह्यामध्ये जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी व त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथजी लांजेवार यांच्या शेतावर बेडवर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी पारशिवनी सूरज शेंडे, सरपंच छायाताई मधुकर नेवारे, पोलीस पाटील प्रेमलताताई भोयर, प्रगतिशील शेतकरी श्रावण इडपाची, सूर्यभान राऊत लक्ष्मण लांजेवार, हेमराज भुतांगे, कृषि पर्यवेक्षक,पी.सी. झेलगोंदे, जे बी भालेराव, कृषि सहाय्यक आर डी सोरमारे उपस्थित होते.

हेही वाचा;

Back to top button