MPSC Exam : एमपीएससी प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा ! | पुढारी

MPSC Exam : एमपीएससी प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाज्योती मार्फत एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी १६ जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतून परीक्षा घेणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली. (MPSC Exam)

सदर एजन्सी मार्फत महाज्योती करीता एमपीएससी पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी २० हजार २१८ उमेदवार पात्र ठरले होते. यातील १३ हजार १८४ उमेदवारांनी महाराष्ट्रातील १०२ परीक्षा केद्रांवर तर दिल्ली येथील २ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. (MPSC Exam)

परीक्षा झाल्यावर काही केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.

चौकशी अधिकाऱ्यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला सदर प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने गैरप्रकाराची चौकशी करून पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची विनंती महाज्योती संस्थेला केलेली आहे. तसेच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी देखील महाज्योतीकडे पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे प्राप्त अहवालानुसार महाज्योतीने एमपीएससी प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा;

Back to top button