नागपूर: निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीमावर्ती भागात विशेष दक्षता | पुढारी

नागपूर: निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीमावर्ती भागात विशेष दक्षता

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आधारित दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नागपुरात झाली. सीमावर्ती भागात विशेष दक्षता घेण्याचे या बैठकीत ठरले. बचत भवनात उभय राज्यांच्या सीमावर्ती भागात काम करणाऱ्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही बैठक झाली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, छिंदवाडाच्या जिल्हाधिकारी शितला पटेल, शिवणीचे पोलीस अधीक्षक रामजी श्रीवास्तव, नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, छिंदवाडाचे पोलीस अधिक्षक विनायक वर्मा, अमरावतीचे रामदास सिद्दभटटी, प्रभात मिश्रा, श्रेयांश कुमत, राजु रंजन पांडे, पी. एस. वारले, रोहित लखासे, यांच्यासह महसूल, गृह व निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सीमावर्ती भागातील उपविभागीय अधिकारी, महसूल, पोलीस अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून निवडणूक काळात होणारी अवैध कामे तसेच दारू व पैशांचा वापर यावर नियंत्रण पथकाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या.
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातील मध्यप्रदेश राज्याशी संलग्न असलेल्या रामटेक, सावनेर, पारशिवणी, नरखेड, देवलापार या भागातील पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button