नागपूर : लोकप्रतिनिधींना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी निधी मिळतो त्याचे कौतुकच- जयंत पाटील | पुढारी

नागपूर : लोकप्रतिनिधींना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी निधी मिळतो त्याचे कौतुकच- जयंत पाटील

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. आज पुरवणी मागण्या 46 हजार कोटीपर्यंत गेल्या.अर्थसंकल्प झाल्यानंतर त्या मांडण्यात आल्या आहेत. एवढा मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करू शकते, मागेल त्याला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळू शकतो याचे मला कौतुक आहे. शेवटी कुठल्याही लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघासाठी निधी मिळाला की आनंद होतोच या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाढीव निधी निर्णयाचे स्वागत केले.

विरोधी पक्ष नेता हा त्या सभागृहात सर्वाधिक सदस्य संख्या असणाऱ्या पक्षाला ठरवायचा असतो त्या संदर्भात लवकरच या आठवड्यात निर्णय घेतला जाईल अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाची कामे असतील म्हनूनच यावेळी ते सगळे कुटुंब घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले असेही पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उगीचच काहीही प्रेडिक्शन करणं योग्य नाही असेही ते मिश्कीलपणे म्हणाले.
अजित पवार हे मुख्यमंत्री होतील की नाही हे माहित नाही.कारण आज एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत .सध्याच्या गणितात ते कसे होऊ शकतात हे कळल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही .

माळीणच्या घटनेनंतर अश्या भागात अडचणीच्या ठिकाणीवरील वस्त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची गरज होती. त्या ठिकाणी नागरिक मागणी करीत असताना वन जमिनी असल्यामुळे अडचणी वाढल्या. दुर्दैवाने ही घटना घडली यावर भर दिला. राज्यात पूरस्थिती अनेक ठिकाणी अत्यंत अवघड आहे. कृष्णा अवघड आहे तेथील नागरिकांनी आम्हाला इथून हलवा असं सांगितलं होतं. या पद्धतीने दगड पडून नुकसान होण्यापूर्वी सरकारने अगोदर उपाययोजना करायला पहिजे होत्या. मात्र तिथे सरकारी योजना पोहोचतच नाही. सरकार कुठेतरी यामध्ये कमी पडत आहे सरकारने या बाबतीत त्वरित मदत करणे आवश्यक आहे असे सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button