चंद्रपूर : पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेले बियाणे | पुढारी

चंद्रपूर : पोलीस पाटलाकडे सापडले राज्यात बंदी असलेले बियाणे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात बंदी असलेले कापसाचे बियाणे गावातील महिला पोलीस पाटील यांच्या घरी आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी मुलासह महिला पोलीस पाटील यांच्यावर कृषी विभागाने कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावातील शेतशिवारात ही कारवाई करण्यात आली.

राज्यात बंदी असलेल्या कापसाचे बियाणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पेरले. शेकडो शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकिस आला. बंदी असलेले बियाणे विक्री करणाऱ्यांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा संशय या घटनेनंतर व्यक्त केला जात आहे. गावात घडणाऱ्या गुन्हेगारीबाबत माहिती देण्याची जबाबदारी पोलीस पाटलाकडे असते. त्याच महिला पोलीस पाटील आणि मुलाला कृषी विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बंदी असलेले चोरबीटी ही कापसाचे बियाणे आढळून आले.

तेलंगनाचा सीमेवर सकमूर हे छोटसं गाव आहे. या गावातून राज्यात बंदी असलेलं कपाशीच चोर बीटी बियाणे मोठ्या प्रमाणात विकले गेले. कृषी विभागाने दहा दिवसांपूर्वी गावात धाड टाकली होती. मात्र विभागाच्या हाती काहीही सापडले नाही. बुधवारी त्यांच्या एका शेतात चोर बीटी बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. माहिती मिळताच कृषी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांच्या टीमने सकमूर मार्गावरील जक्कुलवार हे शेत गाठले. तिथे पाटील यांच्या घरी साडेतीन किलो बंदी असलेले बियाणे आढळून आले. पोलीस पाटलाकडेच बंदी असलेले बियाणे आढळून आल्याने कृषी विभागालाही धक्का बसला.

हेही वाचा : 

Back to top button