Buldhana Urban Bank : शहागडची बुलडाणा अर्बन बँक अवघ्या १५ मिनिटात लुटली; सव्वा कोटींचा मुद्देमाल लंपास | पुढारी

Buldhana Urban Bank : शहागडची बुलडाणा अर्बन बँक अवघ्या १५ मिनिटात लुटली; सव्वा कोटींचा मुद्देमाल लंपास

वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा

शहागडच्या बुलढाणा अर्बन बँकेवर (Buldhana Urban Bank) आज (दि.२८) तीन दरोडेखोरांनी बँक लुटली. सायंकाळी ५ वाजता शसस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात अंदाजे २६ लाख रुपये रोख रक्कम व अंदाजे १ कोटींचे सोने असा एक कोटी २५ लाख रुपये घेऊन तीन दरोडेखोर पसार झाले. हा सर्व दरोडा अवघ्या १५ मिनिटात हा घडला.

या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ व पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे व पोलीस कर्मचारी यांनी येऊन भेट दिली.

Buldhana Urban Bank : दिवसा ढवळ्या चोरीमुळे नागरीक भयभीत

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दिवसा ढवळ्या भरवस्तीत शहागड उड्डाणपूलाच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेत घडला.

सायंकाळी ५ च्या दरम्यान बँक अधिकारी व कर्मचारी कॅश गोळा करून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आवरा आवरी करत असताना अज्ञात तीन बंदुकधारी दरोडेखारांनी आत शिरत दरोडा टाकला.

दरम्यान एकाने सर्व बँक कर्मचाऱ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यांने कॅशिअरला बंदूक लावून लॉकर चावी दे असे म्हणत आत नेत सोने आणि पैसे लुटले.

पोलिस घटनास्थळी दाखल

या दरम्यान एक जण लॉकरच्या दरवाजात उभा होता. सोने व रोख रक्कम घेतल्यानंतर सर्वांना गण लावून बँकेच्या स्ट्रॉंग रूममध्ये कोंडले व एक बॅग व दोन पिशव्या घेऊन दरोडे खोर पसार झाले.

या घटनेची माहिती नंतर गोंदी पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा यांना समजताच घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत अधिक तपास पोलिस अधिकारी करत आहेत. दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करत तपासाला गती दिली आहे.

Back to top button