

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे. भाजपमध्ये यावरून ठाकरे विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. गडकरी म्हणतात, देवेंद्र यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.' असा सल्ला देत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे ट्वीट नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे.
हेही वाचा