सरकारला कोरडा दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू : अंबादास दानवे | पुढारी

सरकारला कोरडा दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू : अंबादास दानवे

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा: पाऊस नसल्याने जिल्हावर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांनो संकट जरी मोठे असले तरी खचून जाऊ नका. आपण सरकारला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सेनगाव गोरेगाव सवना येथील शेतकरी संवाद दौरादरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी, अतिवृष्टी, गारपीट शेतमालाला अल्प प्रमाणात भाव या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. यंदाच्या वर्षी खरिप हंगाम सुरू झाला असताना निसर्गाची हुलकावणी असल्याने गोरेगावसह परिसरात पेरण्या खोंळबल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोरड्या दुष्काळाची पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकऱ्याशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी बॅंक कर्ज पिकविमा, बोगस किटकनाशक औषध खताची चढ्या दराने विक्री, शेतमालाला अल्प प्रमाणात भाव यावर व्यथा मांडल्या आहेत. या बोगस बियांणाबाबतीत कृषी विभागावर आ. दानवे यांनी ताशेरे ओढले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे.

दौऱ्यादरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा कृउबास सभापती राजेश भैय्या पाटील गोरेगावकर, सौ. रुपालीताई पाटील गोरेगावकर यांनी गोरेगाव येथील जिजाऊ चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला आहे. यावेळी मधुकर जामठीकर, प्रदीप पाटील गोरेगावकर, सुधाकर पाटील, देवराव कावरखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सत्कार दरम्यान दानवे यांनी शेतकऱ्यांशी थेट चर्चा करीत शेतकरी बांधवांनो कोरड्या दुष्काळात खचून जाऊ नका सरकारला आपण कोरड्या दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू असा धीर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ अंबादास दानवे यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button