यवतमाळ : वीज पडून महिला मजुराचा मृत्यू; दोन जखमी

यवतमाळ : वीज पडून महिला मजुराचा मृत्यू; दोन जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मागील २४ तासापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी शिवारात शेताची पेरणी करून घरी परतत असलेल्या महिला मजुरावर वीज कोसळली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघीजणी जखमी झाल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि.२६) रोजी सांयकाळी घडली.

सखुबाई राजू राठोड (वय ४७, रा. शेंदूरसनी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संगीता गजानन डोल्हारकर, ज्योती किशोर राठोड या दोन महिला जखमी झाल्या आहेत.

या महिला शेतकरी महादेव काशीराम पारधी यांच्या शेतात पेरणीसाठी गेल्या होत्या. पेरणी झाल्यानंतर घराकडे येत असताना अचानक वीज कोसळली. या घटनेनंतर महिलाना तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून जखमी महिलावर उपचार सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार यू. डी. तुडलवार यांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news