यवतमाळ : दिग्रस येथे वीज पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू; मजूर जखमी | पुढारी

यवतमाळ : दिग्रस येथे वीज पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू; मजूर जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. दिग्रस तालुक्यातही दमदार पाऊस झाला. याच दरम्यान वीज पडून एका बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला, तर एक मजूर किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.४) रोजी दुपारी दिग्रस शहरातील गुरुदेवनगर परिसरात घडली.

शेख असिफ कादर शेख (वय ३२, रा. देऊरवाडी पुनर्वसन) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर शेख सलीम शेख हमजा ( वय ३०. रा. देऊरवाडी) असे घटनेत जखमी झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान शेख असिफ व शेख सलीम हे दोघेजण गुरुदेव नगरातील एका घरावर बांधकामाचे काम करीत होते. त्यावेळी परिसरात अचानक वीज पडली आणि दोघेजण खाली कोसळले. दरम्यान शेख असिफ हा जिन्यावर पडला. यानंतर दोघांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान असिफ यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमी सलीम यांच्यावर उपचार करण्यात आले.

शेख असिफ हा बांधकाम कंत्राटदार तर शेख सलीम हा मजूर म्हणून काम करीत होता. असिफ यांच्यापश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button