नागपुरात अतिसाराचा उद्रेक! दोन गावांची राज्यस्तरीय आरोग्य पथकाकडून पाहणी | Nagpur Outbreak of diarrhea | पुढारी

नागपुरात अतिसाराचा उद्रेक! दोन गावांची राज्यस्तरीय आरोग्य पथकाकडून पाहणी | Nagpur Outbreak of diarrhea

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील अतिसाराचा उद्रेक झालेल्या दोन गावांमध्ये आज राज्यस्तरीय आरोग्य पथकाने पाहणी केली. रुग्णांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जलस्त्रोताकडे लक्ष देण्याची सूचना केली. (Nagpur Outbreak Of Diarrhea )

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार प्रा. आ. केन्द्र भिष्णुर व प्रा. आ केंद्र जलालखेडा अंतर्गत मौजा पेठ मुक्ताईपूर या दोन गावात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे,व युनिसेफ सल्लागार डॉ. अमोल मानकर तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर तसेच, सी. जी. परुळकर प्रभारी अधिकारी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर तसेच साथ रोग पथक जिल्हा परिषद नागपूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन साथ रोग परिस्थिती कशामुळे उद्भवली या कारणाचे शोधन करणे व साथ उद्रेक नियंत्रणाबाबतची कार्यप्रणालीची पाहणी केली. (Nagpur Outbreak Of Diarrhea)

दोन दिवसापूर्वी या भागामध्ये जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी परिस्थितीची पाहणी व रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.

आज राज्यस्तरीय पथकाने रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. प्रत्यक्ष पाण्याच्या स्तोत्राची पाहणी केली. तसेच आज रोजी पेठ मुक्तापुर बाह्य रूग्ण 2, तसेच भिष्णुर बाह्य रूग्ण 27 यापैकी आंतररुग्न 12 आढळून आले.

हेही वाचा

Back to top button