अमोल कोल्हे राष्ट्रवादीतच : अनिल देशमुख | पुढारी

अमोल कोल्हे राष्ट्रवादीतच : अनिल देशमुख

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा मतदारसंघातील चाचपणी सुरु आहे. मात्र,मतदारसंघ बदलासाठी चाचपणी झाल्यानंतर वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील. ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेत जायचं की नाही याबाबतही वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. बॅनरबाजी झाली असली तरी डॉ. अमोल कोल्हे आमच्याच पक्षात आहेत. अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडूनच उमेदवार राहणार आहेत. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तर बीड जिल्ह्यातील नेत्याचे मत घेऊन शरद पवार निर्णय घेतील, असे  माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

विदर्भात अजून काही जागा राष्ट्रवादीला मागण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरु आहे. राष्ट्रवादी जशी चाचपणी करतेय, तशीच चाचपणी काँग्रेस, ठाकरे गट करीत आहे. त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. कुठलेही मतभेद नाहीत असा दावा केला. यासोबतच नागपूर शहरात विधानसभेची जागा मिळावी यासाठी आम्ही काँग्रेस, शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचे देशमुख म्हणाले आहेत.

राज्य किंवा केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा दोन- तीन दिवसात कापसाची होळी केली जाईल असा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय ओबीसी शिबीर नागपूरात होत आहे. शरद पवार आणि इतर नेते नागपूरात येणार आहेत. ओबीसिंचे विषय सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button