शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला | पुढारी

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची भेट कोणत्या विषयाबाबत आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एक नेता पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाबाबत आमंत्रण देण्यासाठी भेट घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय या भेटीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती, असेही शिंदे म्हणाले आहेत.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान, या दोन नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा सुरु असून नेमकी भेट कोणत्या विषयावर आहे? हे अजून गुलदस्त्यातचं आहे.

मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणासाठी भेट

मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता होती. मात्र, शरद पवारांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधलेला नाही.

 

हेही वाचलंत का?

Back to top button