Pakistan Inflation : पाकिस्तानात महागाई आगडोंब; महागाई दर ३७.९७ टक्क्यांवर | पुढारी

Pakistan Inflation : पाकिस्तानात महागाई आगडोंब; महागाई दर ३७.९७ टक्क्यांवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला आहे. सध्या पाकिस्तानातील महागाईचा दर ३७.९७ टक्क्यांवर पोहचला आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारी गुरुवारी समोर आली आहे. खाद्यपदार्थ आणि वाहतूक खर्च ५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. मे २०२२ पासून खाद्यपदार्थ आणि वाहतुकीच्या खर्चामध्ये ५० टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या 12 महिन्यांतील सरासरी महागाई दर 29.16 इतका झाला असल्याची अधिकृत माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. (Pakistan Inflation)

“महागाईच्या या पातळीचा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांवर वाईट परिणाम होतो. त्यांचे उत्पन्न प्रत्येक टक्केवारी बरोबर कमी होत आहे, असे मत मोहम्मद सोहेल यांनी व्यक्त केले आहे. अनेक वर्षांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. राजकीय संकटाने अनिश्चिततेचा आणखी एक पल्ला गाठला आहे. (Pakistan Inflation)

हेही वाचंलत का?

Back to top button