Balu Dhanorkar : मुख्यमंत्री शिंदे आज घेणार धानोरकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट | पुढारी

Balu Dhanorkar : मुख्यमंत्री शिंदे आज घेणार धानोरकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे आज, मंगळवारी (दि.३०) पहाटे तीन वाजताचे सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव वरोरा येथे दुपारी आणण्यात आला आहे. उद्या, बुधवारी (दि.३१) दुपारी अंत्यसंस्कार होणार आहे. सायंकाळी ६ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे वरोरा येथे येत आहेत. यावेळी ते धानोरकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त असलेले खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे आज पहाटे दिल्ली येथे निधन झाले. दुपानंतर त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शन ठेवण्यात आले आहे. वरोरा येथे बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्यसंस्काराकरीता राज्यातील अनेक नेते दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी वरोरा येथे धानोरकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येत आहेत. शिर्डी येथून त्यांचे ५.२० मिनिटांनी नागपूरला आगमन होईल. यानंतर नागपूर येथून ५.५. वाजता चंद्रपूर येथील मोरवा विमानतळावर आगमन होईल. तेथून ते वरोराकडे प्रस्थान करतील ६.१० वाजता वरोरा येथे पोहचून धानोरकर कुटुंबियांची ते भेट घेतील.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करतील. या ठिकाणी ते अर्धा तास थांबतील त्यानंतर ते नागपुर मार्गे मुंबईला रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

अधिक वाचा : 

Back to top button