वाशिम बाजार समितीच्या सभापतीपदी दामूअण्णा गोटे, उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण बिनविरोध | पुढारी

वाशिम बाजार समितीच्या सभापतीपदी दामूअण्णा गोटे, उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण बिनविरोध

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Washim Bazaar Committee) सभापती व उपसभापती पदाच्या निवडी आज (दि. ३०) बिनविरोध पार पडल्या. सभापती पदावर काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनलचे दामूअण्णा गोटे तर उपसभापती पदावर गोवर्धन चव्हाण यांची निवड झाली.

काँग्रेसचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे, वंचितचे विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे, ठाकरे गटाचे डॉ. सुधीर कव्हर यांच्या शेतकरी विकास पॅनलचे ९ संचालक तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या शेतकरी सहकार पॅनलचे ६ संचालक विजयी झाले होते. तर हमाल, मापारी व व्यापारी आणि अडते गटामधून ३ संचालक निवडून  (Washim Bazaar Committee) आले होते.

आज झालेल्या सभापती पदासाठी चांगलीच रस्सीखेच होईल, अशी अपेक्षा असताना सभापती, उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सभापती पदासाठी शेतकरी विकास पॅनलकडून दामू अण्णा गोटे, तर शेतकरी सहकार पॅनलकडून आशा संजय मापारी तर उपसभापती पदासाठी शेतकरी विकास पॅनेलकडून गोवर्धन चव्हाण तर उपसभापतीपदासाठी शेतकरी सहकारी पॅनल कडून नंदकिशोर भोयर यांचे अर्ज दाखल झाले.

हमाल, मापारी व व्यापारी आणि अडते या गटातून निवडून आलेले संचालक शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने होते. त्यामुळे शेतकरी सहकार पॅनेलकडून दाखल केलेले सभापती व उपसभापती पदाचे दोन्ही अर्ज माघारी घेतल्यामुळे सभापती व उप सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये सभापती पदासाठी दामू अण्णा गोटे तर उपसभापती पदासाठी गोवर्धन चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

हेही वाचा 

Back to top button