वाशिम : किन्हीराजा येथील कमलेश्वरी माता मंदिरात चोरी; दागिने, दान पेटीतील रक्‍कम लंपास | पुढारी

वाशिम : किन्हीराजा येथील कमलेश्वरी माता मंदिरात चोरी; दागिने, दान पेटीतील रक्‍कम लंपास

वाशिम : पुढारी वृत्तसेवा जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथील माता कमलेश्वरी मंदिराचे कूलुप तोडून काही अज्ञात चोरटयांनी मंदीरातील दाग- दागीने व दानपेटी मधील रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजाराची चोरी केली. ही घटना २६ मे रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे. आज (शनिवार) सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने किन्हीराजा परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथे दि.२६ मे. (शुक्रवार) च्या मध्यरात्री काही अज्ञात चोरटयांनी मंदिराचे कुलुप तोडून मंदिरात प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर माता कमलेश्वरी मातेच्या अंगावरील ५० हजाराचे सोन्याचे दाग- दागीने तसेच दानपेटी फोडून दानपेटीतील रोख रक्कम ५४ हजार रुपये असा एकूण १ लाख ४ हजार रूपये चोरून चोरटे पसार झाले.

आज (शनिवार) सकाळी कमलेश्वरी माता मंदीराचे पुजारी व विश्वस्त मंडळ दर्शनासाठी गेले असता, दानपेटी फोडून त्या मधील पैसे व माता कमलेश्वरी मातेच्या गळ्यातील दाग- दागीणे चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती संस्थानचे अध्यक्ष उद्धव पाटील गोडे यांच्याकडून पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेत सीसीटीव्ही च्या साह्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. किन्हीराजा गावासह जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस गस्ती वाढविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

हेही वाचा :

सोलापूर : शेतीपंपाच्या विजेचा लपंडाव?
जम्मू-काश्मीर : मुसळधार पावसामुळे घर कोसळून तीन अंध भावांचा मृत्यू
IPL 2023 GT vs MI Qualifier 2 : पराभवानंतर ‘मुंबई इंडियन्‍स’ तुफान ट्रोल, शुभमनमुळेच ‘प्‍ले-ऑफ’मध्‍ये, त्‍याच्‍यामुळेच…

Back to top button